मेकॉलेचे चारित्र्यहननः एक लाजिरवाणा अध्याय
ऐतिहासिक घटना किंवा व्यक्ती यांचे विश्लेषण करताना आपण बरीच माहिती गोळा करतो. ते करताना एक महत्त्वाचा दंडक पाळावा लागतो, तो म्हणजे माहिती तत्कालीन संबद्ध व्यक्तींनी लिहिलेली असावी व ती व्यक्तीही विश्वासार्ह असावी. माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतापेक्षा त्या व्यक्तीने घटनेचे केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन महत्त्वाचे असते. घटना घडून काही वर्षे गेल्यावर आठवणीप्रमाणे लिहिलेले वर्णन कमी विश्वासार्ह असते. …